केशव नागरी सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, अजी-माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थी व समाजसेवकांचा सन्मान
प्रशांत चंदनखेडे वणी :-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेली आणि जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त केशव नागरी सहकारी पतसंस्था वणीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घाटंजी येथील श्री बाळकृष्ण मंगल कार्यालयात शेकडो सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
सभेच्या प्रारंभी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्री गोळवलकर गुरुजी व वंदनीय भारतमाता यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली वाहून दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. अकिल मोहम्मद इकबाल शहजाद (निवृत्त प्राचार्य, गिलाणी महाविद्यालय घाटंजी) व सौ. आलीया शहजाद यांचा संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक मान्यवर शैलेश इंगोले, संदिप मुणोत, वसंतकुमार अटारा, अजाबराव लेनगुरे, हरेंद्र निमसटकर व कविता कर्णेवार यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
तसेच संस्थेच्या सभासदांचे पाल्य असलेले १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी कु. तपस्या अटारा, कु. तनिशा लेनगुरे, जयदिप राउत, कृष्णा दिकुंडवार, कु. श्रुती विठ्ठळकर व कु. नुपुर धोटे यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या भारत–पाक युद्धात "ऑपरेशन सिंदूर" च्या पार्श्वभूमीवर घाटंजी परिसरातील आजी-माजी सैनिक व कमांडो तुळशिदास आत्राम, मधुकर भगत, उत्तमराव अंडूस्कर, किसन गेडाम, दामोधर नेव्हारे, योगेश राठोड, प्रमोद चौधरी, रमेश उमरे, मोहन बुटले, अरुण ठाकरे व जयनारायण जैस्वाल यांचा या कार्यक्रमात संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतंसंस्थेच्या प्रगतीत व विकासात मार्गदर्शक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार भारतीचे जिल्हा संघटन प्रमुख दिपक दिकुंडवार व त्यांची पत्नी कल्पना दिकुंडवार यांचाही कर्मचारीवृंदातर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सभेत मागील वर्षाचे इतिवृत्त पतसंस्थेचे सचिव अनिल आक्केवार यांनी मांडले, तर आर्थिक अहवाल अध्यक्ष चंद्रशेखर खोंड यांनी सादर केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी केले. सत्कारमुर्ती प्रा. डॉ. शहजाद, वसंतकुमार अटारा व संदिप मुणोत यांनी यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन तज्ञ संचालक विनय कोंडावार यांनी केले.
सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर के. खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल आक्केवार तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या या यशस्वी आयोजनासाठी उदय कुळकर्णी, सुमित पोटपिल्लेवार, अक्षय लेनगुरे, नयन पवार, अमर पोटपिल्लेवार, प्रसन्न बडवे, आदित्य पारखे यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारीवर्ग व शाखा व्यवस्थापकांनी परिश्रम घेतले. त्यानंतर राष्ट्रगीताने या भव्य सभेची सांगता झाली.
No comments: