प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील भालर या गावातील विवाहित महिलेने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ नोव्हेंबरला सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संध्या राजू जेऊरकर (४५) असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
भालर येथे परिवारासह राहत असलेली ही महिला आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतात गेली होती. मात्र ती बराच वेळ होऊनही घरी न परल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला असता ती शेजारच्या शेतात निपचित पडून दिसली. तसेच संध्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
मानसिक आजार व तणावातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटनेचा तपास करीत आहे. मात्र एका पाठोपाठ एक आत्महत्या होऊ लागल्याने तालुका हादरला आहे.

No comments: