Latest News

Latest News
Loading...

वणीत काँग्रेसची ताकद दाखवणारी उत्साहपूर्ण बैठक : “एकजुटीतून नगरपरिषदेवर झेंडा फडकवणार!”

प्रशांत चंदनखेडे वणी :-

आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीतील वसंत जिनिंग येथे काल (१ नोव्हे.) काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला उत्साहाचे स्वरूप लाभले.

बैठकीत “एकजूट, विचार आणि जनतेचा विश्वास” या त्रिसूत्रीवर भर देत, यावेळी नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा दृढ निश्चय करण्यात आला. शहरातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा पर्याय म्हणून काँग्रेसच सक्षम ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या बैठकीचे आयोजन काँग्रेसचे नेते संजय खाडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत संघटित पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. “काँग्रेसचा विजय ही जनतेच्या विश्वासाची पुनःस्थापना ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

बैठकीदरम्यान निवडणूक नियोजन, मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचाराची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. शेवटी जयघोष आणि विजयाचा निर्धार व्यक्त करत बैठकीचा समारोप झाला.

No comments:

Powered by Blogger.