प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील इजासन (गाडेगाव) येथील महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबरला रात्री १० वाजता उघडकीस आली. संगिता विठ्ठल निळे (५५) असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
इजासन (गाडेगाव) येथे कुटुंबासह राहत असलेल्या महिलेने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. महिलेने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र तिच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. तालुक्यात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून एका पाठोपाठ एक आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments: