Latest News

Latest News
Loading...

वणी नगरपालिका निवडणूक महासंग्राम : नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १६० उमेदवार ठरले पात्र

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची आज १८ नोव्हेंबरला छानणी करण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून नगरसेवक पदासाठी १६० अर्ज वैध ठरले आहेत. नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षासाठी १० तर नगरसेवकांसाठी २०१ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार पात्र ठरले. तर नगरसेवक पदासाठी १६० उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर असून त्यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, हे स्पष्ट होणार आहे. शहरातील १४ प्रभागातून २९ उमेदवार हे नगर पालिकेवर निवडून जाणार असून नगराध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून होणार असल्याने शहरातील ४९ हजार ५१७ मतदार उमेदवारांचं भाग्य ठरविणार आहेत. 

महाविकास आघाडी व महायुतीत थेट लढत होणार असल्याचे भाकीत वर्तविले जात असले तरी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या निकालाचं चित्र पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच युवा अपक्ष उमेदवार आणि पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या अनुभवी उमेदवारांचही तगडं आव्हान उभं राहणार आहे. त्यामुळे नगर पालिकेची निवडणूक चुरशीची व अटीतटीची होणार असल्याचीही शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. 

महायुती, महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गटाने नगर पालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करतांना शहरात भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मात्र मतदारांचा कौल कुणाला मिळतो, यावर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याने मतदारांची नेमकी काय भूमिका राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतदार हे पक्ष बघतील, की उमेदवार यावर देखील चिंतन केले जात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचं पारडं जड राहील किंवा कोणता उमेदवार बाजी मारेल, याचा सध्या तरी अंदाज बांधणे कठीण आहे.

आज उमेदवारी अर्जाची छानणी झाल्यानंतर  डॉ. संचिता विजय नगराळे (माविआ), विद्या खेमराज आत्राम (महायुती), पायल यशवंत तोडसाम (शिंदे गट), उमा विठ्ठलराव राजगडकर (अपक्ष), पुष्पाताई पुंडलिक आत्राम (वंचित बहुजन आघाडी), पुष्पा कवडू कुळसंगे (आम आदमी पार्टी), भारती संतोष पेंदोर (अपक्ष), शेख काजल इस्माईल अखतर (शरद पवार गट) या महिला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पात्र ठरल्या आहेत. नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांकरिता राखीव आहे. त्यामुळे नगर पालिकेला प्रथमच अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष मिळणार असल्याने अनुसूचित जमातीतील समाजबांधवांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. एसटी समाजातील महिला नगर पालिकेची नगराध्यक्ष होणार असून या समाजातील महिलेला नेतृत्वाची संधी मिळणार असल्याने त्यांना या संधीचं सोनं करता येणार आहे. 

नगरसेवकासाठी पात्र ठरलेले प्रभागनिहाय उमेदवार याप्रमाणे आहेत 

प्रभाग क्रमांक १ (अ) :- मिनाक्षी शैलेश जुनघरे, वसुधा अनिल ढगे, प्रणाली गणेश देऊळकर, प्रभाग क्रमांक १ (ब):- नितीन शंकरराव चहानकर, उमाकांत महादेव जोगी, अजय पांडुरंग धोबे, प्रकाश जनार्धन पिंपळकर, प्रशांत सुदाम फाळके, कैलास तुकारामजी बोबडे

प्रभाग क्रमांक २ (अ) :- मंजुषा मंगेश झाडे, जोत्सना बालाजी धोटे, रिता महेश पहापळे, पुष्पा मधुकर भोगेकर प्रभाग क्रमांक २ (ब) :- आशिष ज्ञानेश्वर डंभारे, राजू किसन तुराणकर, धनराज रमेशराव भोंगळे, वैभव अनिल मांडवकर

प्रभाग क्रमांक ३ (अ) :- अश्विनी विनोद खापणे, शुभांगी रविंद्र ठेंगणे, वैशाली विनोद वातिले, प्रभाग क्रमांक ३ (ब) :- लक्ष्मण महादेवराव उरकुडे, जगन पुरुषात्तम खंडाळकर, अनिकेत अनिल चामाटे, अभिजित अरुण सातोरकर, प्रदीप दामोदर सुंकुरवार

प्रभाग क्रमांक ४ (अ) :- स्नेहा प्रतिक खैरे, माधुरी किरण तेलतुंबडे, ललिता भाऊराव तेलतुंबडे, अर्चना संजय पुनवटकर, मेघा सुधीर पेटकर, प्रभाग क्रमांक ४ (ब) :- वसंता विठ्ठल गायकवाड, नारायण शाहूजी गोडे, प्रवीण शेषराव ढोके, अनिल नानाजी ताजने, निलेश मधुकर परगंटीवार, राकेश लक्ष्मण बुग्गेवार, धिरज गणेश भोयर, सागर अशोकराव मुने

प्रभाग क्रमांक ५ (अ) :- अर्चना सुभाष ताजने, सोनाली प्रशांत निमकर, गीता सचिन पडोळे, प्रभाग क्रमांक ५ (ब) :- संदीप मुरलीधर खोब्रागडे, किशोर काशिनाथ गिरडकर, गौतम दिलीप जिवने, रितिक लक्ष्मण मामीडवार, कपिल भास्कर मेश्राम, रामेश्वर शुक्राचार्य लोणारे

प्रभाग क्रमांक ६ (अ) :- प्रिया अनुप काटकर, करुणा रविंद्र कांबळे, हरिष धम्मदिन पाते, प्रणोती हेमंत बांगडे, रुपाली नारायण लोहकरे, सुनिता गणेश सोनकर, प्रभाग क्रमांक ६ (ब) :- मुकुंदा विद्याधर किटकुले, गंगासिंग गुरुदयालसिंघ चव्हाण, महेश गंगाधर टिपले, विलास मारोतवार डवरे, अनिकेत अनिल बदखल, सिद्धार्थ दिलीप मुन, प्रमोद गोकुल लोणारे, वर्षा अनिल सातपुते

प्रभाग क्रमांक ७ (अ) :- उषा नत्थू डुकरे, प्रीती देवराव बिडकर, पूजा वासुदेव बुरांडे, छाया किशोर मुत्यलवार, रुखसानापरविन इकबाल शेख, शेख सिमरन शेख आसिफ, प्रभाग ७ (ब) :- अतुल झाबाजी घोटकर, नितीन गोपाल धाबेकर, सचिन अरुणराव पाटील, दिलीप हरिदास वनकर, जितेंद्र किसनराव शिरभाते, अभिजित वसंता सोनटक्के, निलेश विठ्ठल होले 

प्रभाग क्रमांक ८ (अ) :- रुपाली संजय कुरेकार, प्रमिला मनोज चौधरी, सारिका पवन सिदमशेट्टीवार, देवयानी संजयराव सूर, प्रभाग ८ (ब) :- प्रशांत विठ्ठलराव कापसे, निखिल प्राभाकर डवरे, सुधीर रिमदेव थेरे, सागर मारोती पोडचलवार, राजू नागोराव रिंगोले, अब्दुल रज्जाक शेख, कुणाल संजय सोमशेट्टीवार, हुसैन आसीम हुसैन मंजूर 

प्रभाग क्रमांक ९ (अ) :- किरण शंकर देरकर, इंदिरा सुधाकर पारखी, भारती श्रीकृष्ण बदखल, प्रभाग ९ (ब) :- अहफीज सत्तार, संतोष नामदेव इचवे, भारत शंकर कुंभारे, राजेश मारोती खाडे, साकिब अहेमद खान, गोविंदा सुरेश दुर्गे, प्रविण प्रभाकर बलकी, शत्रुघ्न मारोती मालेकार, अतिक इनामुर्र्हीम सय्यद 

प्रभाग क्रमांक १० (अ) :- सुरैय्या बानो युसूफ खान, हर्षाली कैलास पचारे, संगिता रामेश्वर मांढरे, आरती गिरीश वांढरे, सखैरुनाबी कादर, मिनाक्षी राजू साठे, प्रभाग १० (ब) :- रेहान युसूफ खान, अनिल लाभचंद चिंडालिया, संजय रतनप्रकाश पुरावार, अक्षय राजेंद्रकुमार बोथरा, निखिल अनिल वैरागडे

प्रभाग क्रमांक ११ (अ) :- सोनाली नितीन आत्राम, अंकिता ज्ञानेश्वर कुळसंगे, पुष्पा कवडू कुळसंगे, रेखा विलास कोवे, ज्योती मधुकर मेश्राम, प्रभाग ११ (ब) :- अजय विठ्ठलराव चन्ने, गणेश रघुनाथ चुरे, राजेश वामनराव डफ, प्रशांत शामराव नक्षणे, मिलिंद राजू बावणे, अशोक गणपत बिलोरीया, लवलेश किशनलाल लाल, शेख मोहम्मद अल्ताफ रहीम 

प्रभाग क्रमांक १२ (अ) :- अफसाना मुस्तकोद्दीन काजी, अक्षता कोकाजी चव्हाण, सोनाली अमृत पुरी, शीला रविंद्र मेश्राम, पूजा रविंद्र रामगिरवार, प्रभाग १२ (ब) :- अविनाश सुनिल उईके, आकाश सुधाकर उईके, नरेंद्र गणपत गेडाम, हरिदास धोंडूजी गेडाम, हरिओम प्रकाश गेडाम, अमोल विजय चांदेकर, विजय रमेश मेश्राम, मनोज कवडू सिडाम 

प्रभाग क्रमांक १३ (अ) :- किरण मुरलीधर कुत्तरमारे, ललिता मारोती भेदोळकर, अलका मारोती मोवाडे, प्रभाग १३ (ब) :- धर्मेंद्र नामदेव काकडे, राजेश्वर सुरेश चापडे, प्रविण अशोक डाहुले, निखिल धर्मा ढुरके, दादाजी लटारी पोटे, पुरण कुंदनगीर पवार, सैफुर मोबीन रहेमान 

प्रभाग क्रमांक १४ (अ) :- मनिषा राजू गव्हाणे, निलीमा सचिन गेडाम, जोत्सना अरविंद पुसनाके, आशाताई पांडुरंग टोंगे, तुळसा प्रविण पेंदोर, वंदना महेश पारखी, माधुरी महेश साळुंके, प्रभाग १४ (ब) :- संतोष पुंडलिक पारखी, दीपक मारोती मोरे, गुलामरसुल वली रंगरेज, सुभाष बाबुलाल वाघडकर. 

No comments:

Powered by Blogger.