खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिती वणी द्वारा आयोजित तालुका स्तरीय अंतिम क्रीडा महोत्सव शासकीय मैदान, वणी येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवातील ‘शो-ड्रिल’ उपक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पेटूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावून पेटूर गावाचा गौरव वाढविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पेटूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण झाडे, उपसरपंच गजानन ढेंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद व-हाटे व उपाध्यक्ष महादेव डवरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय साखरकर, शिक्षिका कु. मिनल बेझलवार, कु. प्रिया ठाकरे व शिक्षक भगवान चव्हाण यांचेही विशेष अभिनंदन केले. शिस्तबद्ध सादरीकरण, सांघिक एकोपा व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही शाळेने अशाच प्रकारे विविध उपक्रमांत उज्ज्वल कामगिरी करावी, अशा यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.


No comments: