Latest News

Latest News
Loading...

जुन्या वादातून तरुणाचा प्राणघातक हल्ला; फरशीच्या तुकड्याने डोक्यात वार, पोलिसांत गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील घोन्सा येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. फरशीच्या तुकड्याने डोक्यात वार करण्यात आल्याने संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मधूकर नानाजी आगूलवार (५४, रा. सदाशिव नगर, चिखलगाव, ता. वणी) यांनी पोलीस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी नुसार, २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी गोल्या उर्फ प्रदीप मुकुंदा बोर्डे (अंदाजे २७, रा. घोन्सा) याने जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीची कॉलर पकडत त्यांना जमिनीवर पाडले.

त्यानंतर आरोपीने त्यांना हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली. आरोपी हा एवढ्यावरच थांबला नाही तर  त्याने घटनास्थळी पडलेला फरशीचा तुकडा उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूस जोरदार वार केला. या हल्ल्यात फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादीने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.  त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी प्रदीप बोर्डे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. किरकोळ वादातून गंभीर हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

No comments:

Powered by Blogger.