Latest News

Latest News
Loading...

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीत भव्य मॅराथॉन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रशांत चंदनखेडे वणी :-

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भगवा ध्वज फडकावून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभल्याने ही मॅराथॉन स्पर्धा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

या मॅराथॉन स्पर्धेत युवक, महिला, बालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली. यात मुलांच्या सर्वसाधारण गटातून विरोचन गोडे याने प्रथम, सौरभ दरणे याने द्वितीय, शिवम जंगठे याने तृतीय तर पियूष पडलमवार याने चतुर्थ क्रमांक पटकावला. तर मुलींच्या सर्वसाधारण गटातून गौरी पांगुळ प्रथम, प्रशांती वसाके द्वितीय, अचल झिले तृतीय आणि समीक्षा हनमंते ही चौथ्या क्रमांकावर राहिली.

१६ वर्षांखालील गटामध्ये (मुले) शिवम ओझा प्रथम, शिवम कुइटे द्वितीय, सुमित ढेंगळे तृतीय तर अयान सिद्दिकी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. तर मुलींच्या १६ वर्षांखालील गटामध्ये नव्या पिदुरकर हिने प्रथम, पल्लवी ठाकरे हिने द्वितीय, जानवी ठाकरे हिने तृतीय तर श्रद्धा देशमुख हिने चतुर्थ क्रमांक पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान सुरक्षितता, नियोजन व उत्साही वातावरण यांचा उत्तम समन्वय पाहायला मिळाला.

हा उपक्रम आमदार संजय देरकर व किरण देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.

या मॅराथॉन स्पर्धेचे नेतृत्व व आयोजन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्याची जाणीव, क्रीडासंस्कृतीचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या प्रसंगी डॉ. संचिता नगराळे, सुरेखा ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, डॉ. विलास बोबडे, टिकाराम खाडे, बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामकर, अक्षय लाडे, संस्कार हेपट तथा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. 


No comments:

Powered by Blogger.