Latest News

Latest News
Loading...

वणी शहरात कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठा गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश; प्रवेशाचा ओघ सुरूच


प्रशांत चंदनखेडे वणी :-

हिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी येथे प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शहरप्रमुख विनोद ढुमणे, किरणताई देरकर, संचिता नगराळे, नगरसेवक तथा गटनेते सुधीर थेरे, उपशहरप्रमुख राजू पाटील, नगरसेविका प्रणाली देऊळकर, नगरसेविका किरण देरकर, महिला तालुका संघटिका सुरेखा ढेंगळे यांच्यासह महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सहसंपर्कप्रमुख संतोष माहुरे, नगरसेवक अनिकेत बदखल, सचिन पाटील, राजू गोलाईत यांचीही या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थिती होती. मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना शिवसेनेचा भगवा दुपट्टा परिधान करण्यात आला. तसेच त्यांच्यावर पक्ष कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी अनिकेत सोनटक्के, अक्षय भोयर, सनी गोलाईत, रवी राळे, सिद्धू गुरनुले, सागर गुरनुले, शुभम लेनगुरे, नयन गोलाईत, निखिल सोनटक्के, रुपेश सोनटक्के, वरुण शेलघरे, कार्तिक पारधी, करण क्षीरसागर, देव गोलाईत, अभिषेक मांदळे, आतिक पठाण, लकी क्षीरसागर, रौनक लेनगुरे, कृष्ण मोहिकर, ओमप्रकाश काकडे, अमित मांदळे, राज शिंगाने, तुषार ठाकरे, देव वाढई, अनिकेत भेंडाळे, वेदांत झट्टे, अंश चौधरी, रोहित भेंडाळे, यश गुरनुले, रियान शेख, लक्ष चौधरी, मेघराज ठाकरे, मुकेश सोनटक्के, राहुल सोनटक्के, मयूर क्षीरसागर, साहिल सोनटक्के, संदीप गुरनुले, सुरेश दुर्गे, मयूर बदखल, सागर वाघाडे, लोकेश मेश्राम, अतुल कडुकर, दिनेश गेडाम, सागर बिहारी आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आजही तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. वणी शहरासह तालुक्यातून शिवसेनेत पक्षप्रवेशाचा ओघ सातत्याने सुरू असून, आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत देण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेला हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवणारा ठरला, असे मत उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.