तालुका शिंपी समाज संस्थेचा मकर संक्रांती उत्सव उत्साहात संपन्न, नवनिर्वाचित नगरसेवक-सेविकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुका शिंपी समाज संस्था महिला कार्यकारिणीच्या वतीने आयोजित मकर संक्रांती उत्सव–२०२६ मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत मार्कंडेय सभागृह, वणी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वणी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्या आत्राम उपस्थित होत्या. यावेळी नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या समाजातील नगरसेवक व नगरसेविकांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम नगराध्यक्षा विद्या आत्राम यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर वणी येथील नवनिर्वाचित नगरसेविका पूजा रविंद्र रामगिरवार, आर्णीच्या प्रीती योगेश शिवरामवार, अहेरीच्या दिपाली मुकेश नामेवार, घाटंजीच्या कु. श्वेता प्रकाश दिकुंडवार, मुल येथील प्राची आनंद आक्केवार, गिम्मा येथील मोनाली संतोष श्रीरामवार तसेच पांढरकवड्याचे नगरसेवक योगेश माधवराव कर्णेवार यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सन २०२४–२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला. यामध्ये कु. निधी अमर गटलेवार, विश्व नंदकिशोर गटलेवार, कृष्णा किरण दिकुंडवार, अंशुमन दिपक दिकुंडवार, कु. आरूषी आशिष रामगिरवार, पियुष राजू गटलेवार, यश अरुण वायझलवार तसेच पदवी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. जान्हवी पद्माकर मंथनवार, ओंकार सुभाष कर्णेवार व ओम सुनिल आक्केवार यांचा गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महिलांसाठी नृत्य स्पर्धा, बांगडी सजावट, टिकली स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा व सेफ्टी पिन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या अर्चना गटलेवार, कु. स्वरा वर्हाडे, पल्लवी राजुर्लेवार, वैशाली नोमुलवार, स्नेहल दिकुंडवार, शीतल आक्केवार यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महिला मंडळाचा हळदी-कुंकू व मकर संक्रांती उत्सव उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल आक्केवार हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव दीपक दिकुंडवार यांनी केले. महिला कार्यकारिणी अध्यक्षा प्रतिभा मंथनवार यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. आभार प्रदर्शन अनुक्रमे संतोष कर्णेवार व अर्चना गटलेवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल अक्केवार, सचिव दिपक दिकुंडवार, उपाध्यक्ष संतोष कर्णेवार, कोषाध्यक्ष कैलास कर्णेवार, महीला कार्यकारणी अध्यक्षा प्रतिभा मंथनवार, वैशाली नोमुलवार, पुजा रामगिरवार, अर्चना गटलेवार, अश्विनी रामगिरवार, शुभांगी गटलेवार, कल्पना दिकुंडवार, संध्या राजुर्लेवार, सुषमा आक्केवार, प्रियंका कर्णेवार, शिल्पा दिकुंडवार, वंदना आक्केवार, पुष्पा मग्गीडवार, प्रणिता गटलेवार, दिपाली दिकुंडवार तथा पदाधिकारी, महिला कार्यकारिणी व समस्त सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वणी तालुका शिंपी समाज संस्था ही केवळ उत्सव साजरे न करता शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून समाजघडणीसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.




No comments: