प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि सद्गुरु जगन्नाथ महाराज जयंतीनिमित्त आज वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर रोडवरील सद्गुरु जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थान येथून सायंकाळी ६ वाजता या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून, संपूर्ण शहर रामनामाच्या गजरात दुमदुमणार आहे.
या शोभायात्रेसाठी आयोजकांनी उत्तम नियोजन केले असून, रथ, पालख्या, सजावट आणि भजन-कीर्तन यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. टाळ-मृदुंगाच्या तालावर सादर होणारे भजन आणि विविध धार्मिक देखावे यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे. महिलांचा हरिपाठ हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. शहरातील मार्गांवरून मार्गक्रमण करताना या शोभायात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी सुरू आहे. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजातील एकोपा आणि परंपरेचे प्रतीक ठरत आहे.
या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन प्रभू श्रीराम व सद्गुरु जगन्नाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजक व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व किरण देरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: