Latest News

Latest News
Loading...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील २० वर्षीय तरुणीला आरोपी संकेत जितेंद्र बुरांडे (वय २५, रा. ब्राम्हणी, वणी) याने लग्नाचे आश्वासन देत तिचे सतत शारीरिक शोषण केले. ऑक्टोबर २०२४ पासून ते २४ मार्च २०२६ दरम्यान वणी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने संबंधित तरुणीशी ७ ते ८ वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, २४ मार्च रोजी तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिल्याने तरुणीला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यामुळे तरुणीने सरळ पोलिसांत धाव घेत आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संकेत बुरांडे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौधरी करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.