सहकार क्षेत्रात यवतमाळची उल्लेखनीय कामगिरी; सदस्य नोंदणीत राज्यात द्वितीय क्रमांक, पदाधिकाऱ्यांचा गौरव
सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या ५ एप्रिल रोजी झालेल्या तृतीय सत्रात सदस्य नोंदणीचा आढावा सादर करण्यात आला. या आढाव्यात यवतमाळ जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्यातून एकूण २१०५ सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती समोर आली.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे या यशातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण व शहरी भागात संघटनात्मक पातळीवर करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली असल्याचे सांगण्यात आले.
या यशाबद्दल सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके व प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रदेश सदस्य अजय मुंदडा, ग्रामीण प्रकोष्ठ सहप्रमुख संजय जोशी, विभाग प्रमुख अमित भिसे, सहप्रमुख संजय कुरेकर, जिल्हाध्यक्ष श्यामकुमार लोखंडे, जिल्हा महामंत्री रामजी साकळे, संघटन प्रमुख दिपक दिकुंडवार, संतोष गावंडे तसेच सहकार सुगंध विदर्भ रिजनल हेड हे सर्व पदाधिकारी या सत्काराचे मानकरी ठरले.
या प्रसंगी मान्यवरांनी यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अशाच पद्धतीने कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या यशामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकार क्षेत्रात यवतमाळची मान उंचावली आहे.


No comments: