Latest News

Latest News
Loading...

वणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षीही शहरात उत्साह, जल्लोष आणि थाटात साजरी करण्यात येणार असून जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरातील प्रत्येक वार्ड, मोहल्ला आणि प्रभागात जयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांतून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येणार असून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. प्रत्येक नगरात विविध उपक्रमांमुळे जयंतीचा उत्साह अधिकच वाढला आहे.

दरम्यान, शहरातील मनीष नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विश्वशांती बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित या उत्सवात विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. परिसरात आकर्षक बॅनर आणि सजावटीमुळे उत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे.

जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता बुद्ध विहाराच्या भव्य पटांगणावर प्रबोधनपर बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक अजित खंदारे व त्यांचा संच हा कार्यक्रम सादर करणार असून त्यांच्या सुमधुर आवाजातील गीतांमधून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हा मानवतेचा आणि समतेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विजय नगराळे यांनी केले आहे.

यंदाची जयंती शहरात एकात्मता, समता आणि विचारांचा संदेश देणारी ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Powered by Blogger.