Latest News

Latest News
Loading...

बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळील डी.पी. हटविण्याची मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळ असलेली अवैध डी.पी. (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) तात्काळ हटवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सदर डी.पी. ही खाजगी स्वरूपाची असून अतिक्रमण करून सरकारी जागेवर बसविण्यात आली आहे. त्यामुळे स्मारकाच्या सौंदर्यीकरणाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात स्मारकाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी रहदारीलाही अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ही डी.पी. तात्काळ हटवून इतर ठिकाणी स्थलांतरित करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील, असेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख शरद धुमणे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगर परिषद गटनेते सुधीर थेरे, शहर समन्वयक मोरेश्वर उज्वलकर, नगरसेवक गुलाम रसूल रंगरेज, अजय धोबे, शत्रुघ्न मालेकर, प्रणाली देऊळकर, किरण शंकर देरकर, अनिकेत बदखल, युवासेना शहरप्रमुख तुलसी तेवर, विभाग प्रमुख बबन केळकर, भूषण सहारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.