Latest News

Latest News
Loading...

शेत शिवारात मृतावस्थेत आढळला इसम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरालगत मंदर व वागदरा (जुना) दरम्यान असलेल्या शेत शिवारात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना बुधवार २७ मे ला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शंकर शंडकू आत्राम (५५) असे मृतकाचे नाव आहे. 

मृतक शंकर आत्राम हा शहरातील खडबडा मोहल्ला परिसरातील गॅस गोडाऊनजवळ राहत होता. तसेच तो ट्रॅक्टर चालक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ट्रॅक्टरमध्ये लाकडं वाहून नेण्याचं तो काम करायचा. काल २६ मे ला तो शेत शिवारात लाकडं गोळा करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. भर उन्हात लाकडं गोळा करत असतांना उष्णतेचे चटके जाणवू लागल्याने तो एका झाडाच्या सावलीखाली विसावला. मात्र उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असल्याने उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्याच्या नाकातून रक्त वाहत असल्याने उष्माघाताचा तो बळी ठरल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. 

शेत शिवराकडे जाणाऱ्या नागरिकांना सदर व्यक्ती हा मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही वार्ता परिसरात पसरली. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदानंतर मृतक शंकर आत्राम याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.