Latest News

Latest News
Loading...

देशपांडे ले-आऊटमध्ये बुद्ध-भीम गीतांची सुरेल मैफल; १० मे रोजी प्रबोधनाचा स्वरझंकार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

बुद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशपांडे ले-आऊटमध्ये प्रबोधनाचा स्वरझंकार अनुभवायला मिळणार आहे. सम्यक महिला मंडळ तथा बौद्ध बांधवांच्या वतीने १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता पंचशील ध्वजाजवळील खुल्या पटांगणावर प्रबोधनपर बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या विशेष मैफलीत पुसद येथील सुप्रसिद्ध गायक प्रा. प्रविण राजहंस आपल्या सुमधुर आवाजातून बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांची गीते सादर करणार आहेत. त्यांच्या गीत गायनातून सामाजिक जाणीवा, समता आणि परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याने या कार्यक्रमाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बुद्ध पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने सम्यक महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याच मालिकेतील बुद्ध भीम गीतांचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन रामटेके यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुचित्रा कांबळे राहणार आहेत. तर संजय तेलंग, किशोर चहांदे, अशोक भगत, विजय नगराळे, मंगल तेलंग, राजू गजरे, नवनाथ नगराळे, गौतम तेलंग, बबलू मेश्राम, सुरेश रायपुरे यांची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

बुद्ध-भीम विचारांनी भारलेली ही मैफल केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रबोधनाची संधी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सम्यक महिला मंडळाच्या अध्यक्षा ममता पाटील, उपाध्यक्षा सुचित्रा कांबळे, सचिव लविता खैरे, सहसचिव संगीता वनकर, कोषाध्यक्ष प्रज्ञा पाटील व सदस्य ज्योती चंदनखेडे, प्रणाली अंबागडे, प्राजक्ता ढोके, मंदा मुन, निलम धोटे यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.