प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक तथा शिवसेनेचे (उबाठा) शहर समन्वयक मोरेश्वर उज्वलकर यांच्या मातोश्री मंजुळाबाई राघोबाजी उज्वलकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने उज्वलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोककळा पसरली आहे.
मंजुळाबाई उज्वलकर या अत्यंत प्रेमळ, शांत आणि मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. आयुष्यभर कष्ट करत त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला. साधेपणा, माणुसकी आणि संस्कार यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळत होता. मुलांच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मायेच्या छायेत वाढलेल्या कुटुंबासाठी त्यांचे जाणे ही कधीही न भरून निघणारी पोकळी ठरली आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सामाजिक, राजकीय, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोरेश्वर उज्वलकर यांच्या निवासस्थानी भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उज्वलकर कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदविला. परिसरात दिवसभर शोकाकूल वातावरण पाहायला मिळाले.
त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता राहत्या घरून निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंजुळाबाई उज्वलकर यांच्या निधनाने एक संस्कारवंत, कष्टाळू आणि जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

No comments: