Latest News

Latest News
Loading...

गवंडी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी :-

गवंडी काम करणाऱ्या तरुणाने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार ११ मे ला सकाळी उघडकीस आली. रामेश्वर संतोष निषाद वय अंदाजे २२ वर्षे असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

मूळचा छत्तीसगड राज्यातील अंबागड चौकी जिल्ह्यातील मुंगरा गावचा रहिवाशी असलेला हा तरुण सध्या चिखलगाव येथील निळकंठ नगर परिसरात तात्पुरता निवारा बांधून राहत होता. या परिसरात छत्तीसगड येथील बरेच कामगार वास्तव्याला आहेत. या सर्व छत्तीसगडी मजुरांसोबत तो गवंडी काम करायचा. सोमवारी सकाळी प्रातःविधीसाठी घराबाहेर पडलेल्या रामेश्वरने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. 

तरुण बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तो झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला, आणि मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.