महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विश्वासार्ह प्रवास; श्री लक्ष्मी महिला पतसंस्थेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा ध्यास घेत अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या श्री लक्ष्मी महिला पतसंस्थेचा चौथा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सहकार, बचत आणि स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात पतसंस्थेच्या चार वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तर भविष्यातील योजनांचीही माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली.
या कार्यक्रमाला पतसंस्थेच्या मार्गदर्शिका किरण देरकर, उपाध्यक्षा वैशाली देठे, संचालिका डॉ. संचिता नगराळे, अमीना पठाण, व्यवस्थापक आशीष बदकी, सर्व कर्मचारी, दैनिक अभिकर्ते तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी आकर्षक ठेवी योजना, सुलभ कर्ज सुविधा आणि स्पर्धात्मक व्याजदरांच्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या. महिलांनी बचतीची सवय अंगीकारून आर्थिक नियोजन करावे, या उद्देशाने पतसंस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मार्गदर्शिका किरण देरकर यांनी आपल्या मनोगतात पतसंस्थेच्या चार वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर आत्मविश्वास आणि स्वावलंबन देण्याचे काम पतसंस्था करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करत प्रगतीची वाटचाल करणाऱ्या श्री लक्ष्मी महिला पतसंस्थेने अनेक महिलांना बचत, कर्ज व आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून सक्षम बनविले आहे. सहकार क्षेत्रात महिलांसाठी एक विश्वासार्ह आर्थिक व्यासपीठ म्हणून पतसंस्थेची ओळख निर्माण झाली असून, आगामी काळातही महिलांच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी नवनवीन योजना राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उत्साह, आत्मविश्वास आणि आर्थिक प्रगतीचा संदेश देणारा हा वर्धापन दिन सोहळा सभासदांसाठी प्रेरणादायी ठरला.
"बचतीतून स्वावलंबन, सहकारातून सक्षमीकरण"
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी समर्पित असलेल्या श्री लक्ष्मी महिला पतसंस्थेने चार वर्षांत विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभावाच्या बळावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. वर्धापन दिनाचा हा सोहळा केवळ उत्सव नसून महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रवासातील आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद ठरला.


No comments: