Latest News

Latest News
Loading...

भालर मार्गावरील हनुमान मंदिराजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवक

संग्रहित फोटो 
प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी-भालर मार्गावरील हनुमान मंदिराजवळील झुडपात एक युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना शनिवार २५ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रवि नेहारे वय अंदाजे ३४ ते ३५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे. 

वणी तालुक्यातील बोरगाव (अहेरी) येथे परिवारासह राहणारा रवि हा ट्रक चालक असल्याचे समजते. तो वेकोलिशी अधिनस्त असलेल्या एका ओबी कंपनीत ट्रक चालवायचा. मात्र काही कारणास्तव त्याला त्या कंपनीतून काम सोडावे लागले. मागील एक महिन्यांपासून तो घरीच होता. अशातच आज त्याचा हनुमान मंदिर परिसरातील झुडपात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. 

त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवि नेहारे याच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलीस त्याच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

No comments:

Powered by Blogger.