Latest News

Latest News
Loading...

गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रातील गुरुजनांचा भाजपकडून सन्मान

प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व जपत गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडळाच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाला ज्ञान, संस्कार आणि सेवेमार्फत दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

या उपक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड, धार्मिक क्षेत्रातील हरिभक्त पारायण मुन्ना महाराज तुगनायत, शैक्षणिक क्षेत्रातील गजानन कासावार गुरुजी, सामाजिक क्षेत्रातील निवृत्त शिक्षक बोधे गुरुजी, आरोग्य क्षेत्रातील डॉ. सपाट तसेच क्रीडा क्षेत्रातील राजू डवरे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, भाजप शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, मंडळ सरचिटणीस तथा नगरसेवक लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक अनिल चिंडालिया, मंडळ सरचिटणीस तथा कार्यक्रम समन्वयक हितेन अटारा, मंडळ उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, प्रा.रोहित वनकर, राजेंद्र साखरकर, गणेश आसूटकर, भारती बदखल, महिला मोर्चा अध्यक्षा नीता पिदुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर, श्रेयस हरणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणाऱ्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा जपण्याचा आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.