Latest News

Latest News
Loading...

अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी केली अटक


प्रशांत चंदनखेडे वणी :-

एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमपाशात अडकवून तिच्यावर मातृत्व लादण्यात आल्याची धक्कादायक घटणा ३० जूनला उघडकीस आली. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शीघ्र कारवाई करत अल्पवयीन तरुणीवर मातृत्व लादणाऱ्या प्रियकराला अटक केली. साहिल काळे (२०) रा. वनोजादेवी ता. मारेगाव असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे.

साहिल काळे याने आधी या मुलीशी जवळीक साधत प्रेमसंबंध निर्माण केले. नंतर तिला विश्वासात घेऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेत त्याने सतत ७ महिने तिचं शोषण केलं. यातूनच तिला गर्भधारणा झाली. दरम्यान मुलीमध्ये शारीरिक बदल जाणवू लागल्याने कुटुंबियांना शंका आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. 

साहिल काळे याने प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले, व मुलीसोबत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या तरुणाविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीवर बीएनएसच्या कलम ६४(१), ६९ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात सपोनि प्रियंका चौधरी करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.