Latest News

Latest News
Loading...

हुरहुन्नरी युवक बंडू अंबुरे याचं आजारानं निधन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील विराणी टॉकीज (फंक्शन हॉल) परिसरात राहणारे बंडू उर्फ देवेंद्र ज्ञानेश्वर अंबुरे यांचं मंगळवार ४ ऑगस्टला रात्री ११.५० वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ५० वर्षांचं होतं. त्यांना अन्न नलिकेचा कॅन्सर (कर्करोग) झाल्याने त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांचं दुःखद निधन झालं. आज ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

बंडू अंबुरे हा हुरहुन्नरी आणि कर्तबगार युवक होता. मागील अनेक वर्षांपासून तो डिश केबल टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. मध्यंतरी तो वायफायची देखील कामे करायचा. त्याचा मित्र परिवार मोठा होता. मित्र परिवारात तो जास्त रमायचा. सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या बंडूचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. मित्र परिवारातील कोणत्याही कामाला वेळेवर धावून जाणारा बंडू मित्र परिवारातून कायमचा निघून गेला. त्याला कॅन्सर सारखा गंभीर आजार जडला आणि उपचार सुरु असतांनाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबासह मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. बंडू अंबुरे याच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्च्यात आई, वडील, बहीण, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.  

No comments:

Powered by Blogger.