Latest News

Latest News
Loading...

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीस अटक

प्रशांत चंदनखेडे वणी :- 

अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिला गर्भवती करणाऱ्या तरुणाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात पोक्सो व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिक्षणासाठी आपल्या मोठी आईसोबत शहरातील एका परिसरात किरायाने राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला त्याच परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली.

दरम्यान मुलीच्या शारीरिक बदलावरून कुटुंबियांना शंका आल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीने केलेल्या शारीरिक शोषणामुळे मुलीला गर्भधारणा झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलीच्या आईने मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयात मुलीवर मातृत्व लादणाऱ्या तरुणाविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. 

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शीघ्र तपासचक्रे फिरवीत आरोपीला तात्काळ अटक केली. विक्की प्रभाकर भोसले (२३) असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ कार्यालयीन पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.