Latest News

Latest News
Loading...

वाढदिवस विशेष वृत्तांकन : समाजसेवेच्या वाटेवरचा ‘हक्काचा माणूस’ आणि दिलदार मनाचा लोकनेता


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक पुढारी तथा शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) यवतमाळ जिल्हा संघटक विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- विनायक अर्बन क्रेडिट सोसायटी लि. वणी 

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना पद, प्रतिष्ठा आणि राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून विजयबाबूंची ओळख निर्माण झाली आहे. समाजातील गोरगरीब, गरजू आणि अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाणे, हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची खरी ओळख ठरली आहे.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव मनाशी बाळगत विजयबाबूंनी अनेक वर्षांपासून विविध सेवाभावी आणि सामाजिक उपक्रमांना बळ दिले. संकटाच्या काळात एखाद्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणे किंवा गरजूंच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे— असा त्यांच्या मदतीचा आवाका मोठा आहे. म्हणूनच अनेकांच्या आयुष्यात ते केवळ मदत करणारे व्यक्ती राहिले नसून आधारवड बनले आहेत.

शिक्षणासाठी मदतीचा हात, आरोग्यासाठी संवेदनशील मन
गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयबाबूंची मदतीची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यांच्या भवितव्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे राहू नये, हा त्यामागचा माणुसकीचा विचार.

आरोग्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना त्यांनी मदतीचा हात दिला. महागड्या उपचारांपासून शस्त्रक्रियांपर्यंत मदत, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. गरजू नेत्ररुग्णांवर स्वखर्चाने उपचार व शस्त्रक्रिया करून अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याचे कार्यही त्यांच्या माध्यमातून घडले.

धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांनाही भक्कम पाठबळ
सामाजिक कार्यासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विजयबाबूंचा सहभाग कायम राहिला आहे. मंदिरांच्या विकासासाठी मदत करण्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करण्यापर्यंत त्यांचा सहभाग दिसून येतो. गोकुळाष्टमीसारखे उत्सव त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरे होतात. धार्मिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही त्यांनी वेळोवेळी आर्थिक पाठबळ दिले आहे.

त्यांच्यासाठी समाजसेवा ही केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा प्रसिद्धीसाठी केलेली कृती नाही; तर गरजू माणसाच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहण्याची वृत्ती आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी आपलेपणाचे स्थान निर्माण केले आहे.

धुरंधर राजकारणी; मात्र राहणीमान साधे
दीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर विजयबाबूंनी राजकारणातील अनेक चढ-उतार जवळून अनुभवले आहेत. राजकीय डावपेचांचा सखोल अभ्यास, परिस्थितीचे अचूक आकलन आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांच्याकडे कुशल आणि धुरंधर राजकीय नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

व्यापारी क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मात्र साधेपणा कायम आहे. मोठेपणाचा आव न आणता सर्वसामान्यांमध्ये मिसळणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि अडचणीच्या प्रसंगी मदतीला धावून जाणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ, रुग्णांच्या उपचारांना आधार, गरजू कुटुंबांना मदतीचा हात आणि सामाजिक-धार्मिक उपक्रमांना भक्कम पाठबळ—या विविध भूमिकांमधून विजयबाबूंच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकी अधोरेखित होते. म्हणूनच आज ते अनेकांसाठी केवळ राजकीय नेता नसून, संकटसमयी आठवणारा ‘हक्काचा माणूस’ बनले आहेत.

विजयबाबूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी कार्याला मनःपूर्वक सलाम!
माणुसकीची ही ज्योत अशीच अखंड तेवत राहो आणि त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक होत राहो, हीच सदिच्छा.

विजयबाबूंना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Powered by Blogger.