Latest News

Latest News
Loading...

भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनी वणीत प्रबोधनात्मक व्याख्यान


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा वणी शहर, तालुका तसेच महिला शाखेच्या संयुक्त विद्यमाने स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता भीमनगर येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. उत्तम शेंडे तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा, यवतमाळ पूर्वच्या जिल्हाध्यक्ष प्रा. संघरत्ना आठवले मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मौलिक व प्रबोधनात्मक विचारांतून उपस्थितांना वैचारिक दिशा मिळणार असून, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका अध्यक्ष राजू गजरे राहणार आहेत. भगवान इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर नलिनी थोरात स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच हेमंतकुमार टिपले व खुशाल काळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचिता पाटील करणार असून, सूत्रसंचालन वैशाली पाटील करतील. मधुकर पळवेकर आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

या स्मृती व्याख्यानाला भारतीय बौद्ध महासभेच्या शहर व तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रबोधनात्मक व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.