Latest News

Latest News
Loading...

सुशगंगा तंत्रनिकेतनच्या २३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 

प्रशांत चंदनखेडे वणी :-

सुशगंगा तंत्रनिकेतन, वणीच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच रोजगाराच्या क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेत १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह-२०२६ मध्ये तब्बल ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी २३ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानासह कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. हायली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लिमिटेड, अहमदाबाद; एमआरएफ टायर्स, हैदराबाद; टाटा मोटर्स, चिखली, पुणे आणि अपोलो टायर्स, बडोदा आदी नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली.

कंपनीनिहाय निवड झालेले विद्यार्थी याप्रमाणे आहेत, हायली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लिमिटेड अहमदाबाद - अमर बोथाडे (ईई), विकेंद्र वैद्य (ईई); एमआरएफ टायर्स हैदराबाद - अमोझ बेग (एमई), अमन शेख (एमई), जिशान खान (ईई), गौरव मालेकर (ईजे); टाटा मोटर्स चिखली, पुणे - कशाफ पठाण (ईजे), संजीवनी राजुरकर (ईजे), कृष्णा खरवांशी (ईई), साहिल शेंडे (सीएम), प्रथमेश मार्तवार (सीएम), अमिषा सिंग (ईई), प्रणय डाखरे (सीई), वेदांत माटे (एमई); अपोलो टायर्स, बडोदा - वैष्णवी जैस्वाल (ईजे), अनिर्बान गोस्वामी (बीएससी), प्रद्न्या डाखरे (ईई), वैजयंती तुरणकर (ईजे), हर्षल चुनारकर (ईजे), आशिफ शेख (ईई), प्रज्वल वाघाडे (ईई), अथर्व ताटेवार (एमई) पवन आघम (सीई).

गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाला यशाची जोड
सुशगंगा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झालेली निवड ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबतच प्रशिक्षण व प्लेसमेंटच्या प्रभावी नियोजनाचे फलित मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळणे ही संस्थेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्लेसमेंट ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी आमधने प्रायव्हेट लिमिटेड, मानव संसाधन विभागाचे अधिकारी गौरव व्यास यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोंगिरवार, उपाध्यक्ष मोहन बोंगिरवार, प्राचार्या पुष्पा राणी, टी. अँड पी. अधिकारी चैतन्य तुर्विले आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या टीमने केलेले मार्गदर्शन व त्यांच्या सहकार्याचे कौतुक करण्यात आले.

२३ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळालेली संधी ही सुशगंगा तंत्रनिकेतनच्या प्लेसमेंटच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याला उद्योगविश्वाची मिळालेली ही दाद भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे.

No comments:

Powered by Blogger.