विकासकामांची छाप अन् जनतेशी नाते; माजी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्तांत
प्रशांत चंदनखेडे वणी :-
विधानसभेच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय संपादन करणारे तसेच वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला चालना देणारे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
शुभेच्छुक :- ऍड. निलेश महादेवराव चौधरी (वणी शहर अध्यक्ष बिजेपी ) तथा सौ. स्मिता निलेश चौधरी ( सदस्य बिजेपी वणी)
वणी विधानसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सुविधांच्या विकासासाठी निधीचा पाठपुरावा झाला. वणी शहरातील अंतर्गत रस्त्यांपासून शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपर्यंत विविध कामांना त्यांच्या कार्यकाळात चालना मिळाली.
वणी-वरोरा मार्गाचा विकास, रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलांना मंजुरी, शहरातील सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, क्रीडा संकुल आणि उद्यानांच्या विकासासाठीही त्यांनी निधी खेचून आणला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांची आजही राजकीय वर्तुळात चर्चा होते.
यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्याऐवजी युवकांना सकारात्मक संदेश देणाऱ्या उपक्रमावर भर देण्यात आला आहे.
‘वाढदिवसाचा जल्लोष नको, सामाजिक संदेश महत्त्वाचा’
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लोकमान्य टिळक महाविद्यालय या मार्गावर होणाऱ्या मॅरेथॉनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात होणार आहे. युवक-युवतींमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विकासकामांची नोंद आणि राजकीय प्रवासाचा एक टप्पा
संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात वणी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळविण्यात त्यांना यश आले. त्यांच्या कार्यकाळात वणी शहराचा चेहरामोहराच बदलला.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा आणि सार्वजनिक जीवनातील प्रवासाचा आढावा घेतला जात आहे. दहा वर्षांच्या आमदारकीतील विकासकामांचा मागोवा आणि वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रम यामुळे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा यंदाचा वाढदिवस राजकीय जल्लोषापेक्षा त्यांच्या कार्याच्या स्मरणातून आणि नशामुक्तीच्या संदेशातून साजरा करण्यावर भर देण्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.


No comments: