Latest News

Latest News
Loading...

वणी विधानसभा मतदारसंघातील महसूल प्रश्नांसाठी महसूलमंत्र्यांची भेट


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा मतदारसंघातील विविध महसूल विषयक प्रश्न, प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी भाजप वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण महसूल विषयक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या बाबी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

जमीन व महसूल विषयक प्रकरणे, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सामान्य नागरिकांना महसूल कार्यालयीन कामकाजात होणाऱ्या अडचणी दूर करून प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या सर्व विषयांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, वणी विधानसभा मतदारसंघातील महसूल विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे ॲड. निलेश चौधरी यांनी सांगितले.

मतदारसंघातील प्रलंबित महसूल प्रश्न थेट शासनाच्या पातळीवर मांडल्याने त्यांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.