Latest News

Latest News
Loading...

मागून येणाऱ्या भरधाव कारची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :- 

भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार २७ सप्टेंबरला दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास वणी-घुग्गुस मार्गावरील जन्नत सिलेब्रेशन हॉल जवळ घडली. बाळाजी टोंगे वय अंदाजे ६५  ते ६७ वर्षे असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक असल्याचेही ऐकायला मिळत आहे. 

वणी घुग्गुस मार्गाने वणीकडे येत असलेल्या दुचाकीला (MH २९ BQ ४७१९) मागून सुसाट वेगाने येणाऱ्या कारने (MH २९ AB ७७७१) जोरदार धडक देत दुचाकीला काही अंतर फरफट नेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून ऐकायला मिळत आहे. या भीषण अपघातात दुचाकी चालक बाळाजी टोंगे यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कारचालक हा कार येथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येते. 

बाळाजी टोंगे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याचे सांगण्यात येत असून ते पुनवट (पुरड) येथून वणीला परतत असतांना हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. बाळाजी टोंगे हे शहरातील प्रगती नगर येथे राहत होते, अशी चर्चाही घटनास्थळावरून ऐकायला मिळत आहे. कारचालकाने भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. कारने चालत्या दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी काही अंतर फरफट गेली. या भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.