प्रशांत चंदनखेडे वणी :-
रिमझिम पावसाच्या सरी सुरू असतानाही तरुणाईचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ‘नशामुक्त भारत’चा संदेश देत २५० युवक-युवतींनी धाव घेतली आणि वणी शहरात आरोग्य, क्रीडा व व्यसनमुक्तीचा जागर घडवून आणला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी विधानसभा यांच्या वतीने शुक्रवारी (२५ सप्टेंबर) *‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन’*चे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा लोकमान्य टिळक चौक येथून सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरींमध्येही युवक-युवती मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. धावण्याच्या माध्यमातून व्यसनापासून दूर राहण्याचा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
मॅरेथॉनमध्ये १६ वर्षांखालील मुले-मुली तसेच १६ वर्षांवरील युवक-युवती अशा चार गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम चार क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हे ठरले मॅरेथॉनचे मानकरी
गट-अ : १६ वर्षांखालील मुले
प्रथम – शिवम भोलेनाथ ओझा, द्वितीय – हसन नूर सय्यद, तृतीय – मोहम्मद फयाज अली, चतुर्थ – वेद राजू देठे.
गट-ब : १६ वर्षांखालील मुली
प्रथम – नव्वा श्रीराम पिदुरकर, द्वितीय – प्रणाली प्रकाश ठाकरे, तृतीय – हिमांशी प्रेमदेव कावडे, चतुर्थ – तनुश्री संजय टिकले.
गट-क : १६ वर्षांवरील मुले
प्रथम – पियुष संतोष पदलमवार, द्वितीय – आकाश श्रावण ठमके, तृतीय – क्रिश सतीश मिस्त्री, चतुर्थ – सौरभ अरुण दरणे.
गट-ड : १६ वर्षांवरील मुली
प्रथम – गौरी रामदास पांभूळकर, द्वितीय – अल्फिया शफी शेख, तृतीय – शास्वती कवडू बुरडकर, चतुर्थ – खुशबू मारोती निखाडे.
या उपक्रमासाठी प्रा. दिलीप मालेकर, महेश पहापळे, बंटी शेंडे, संतोष बेलेकर, वणी पोलीस स्टेशन, वणी वाहतूक पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय वणी, नगर परिषद वणी तसेच शिवशाही ॲम्ब्युलन्सचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपच्या वणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन राजू गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाजपचे वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी केले. विजेत्यांच्या गौरवाने आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागाने मॅरेथॉनचा समारोप झाला.

No comments: