Latest News

Latest News
Loading...

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सुशगंगा कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी आणि सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर तसेच फार्मासिस्ट विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान, चला करूया जीवनदान!” या संदेशातून विद्यार्थ्यांनी रक्तदानासाठी समाजाला प्रेरित केले. फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी WCLचे सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. रनदिवे तसेच डॉ. हेडगेवार ब्लड सेंटरचे PRO किरण इंगळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या सामाजिक उपक्रमासाठी परवानगी, प्रोत्साहन आणि सहकार्य दिल्याबद्दल सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष प्रदीप बोंगिरवार आणि व्यवस्थापकीय संचालक मोहन बोंगिरवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनील बी. पवार आणि सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्या पुष्पाराणी यांचे मार्गदर्शन लाभले.

फार्मसी विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून ‘रक्तदान करा–जीवन वाचवा’ आणि ‘फार्मासिस्ट दिन साजरा करूया, समाजसेवेचा संदेश देऊया’ असा संदेश देत सामाजिक जाणीव जागृत केली. शिक्षणासोबतच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

No comments:

Powered by Blogger.