प्रशांत चंदनखेडे वणी :-
यवतमाळ जिल्ह्यात विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असताना समितीचे सदस्य वणी येथे दाखल झाले. यावेळी समितीने आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली.
आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच परिसरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे आमदार देरकर यांनी समितीचे लक्ष वेधले. या प्रश्नांबाबत निवेदन सादर करून शासनस्तरावर गांभीर्याने विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रातील प्रश्न थेट समितीसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने आगामी काळात या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे समितीच्या पाहणी व चर्चेकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी वणी शहराच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीमध्ये आमदार अर्जुन खोतकर, दिलीप बोरसे, काशीराम पावरा, कृष्णा खोपडे यांचा समावेश होता.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक गणपत लेडांगे, वणी शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संघटक मनीष बत्रा, नगरसेवक सुधीर थेरे, अजय धोबे, अनिकेत बदखल, गुलाम रंगरेज, तसेच जगण जुनघरी, अभय मुथा, सुमेर खान, महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे आदी उपस्थित होते.
समितीच्या या दौऱ्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यातून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments: