प्रशांत चंदनखेडे वणी :-
दिल्ली येथे आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर वणी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
लोकशाही व्यवस्थेत राजकीय नेत्यांशी सन्मानपूर्वक वागणूक ठेवली जावी, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या वेळी मांडली. दिल्लीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात काँग्रेसचे प्रा. टिकाराम कोंगरे, डेव्हिड पेरकावार यांच्यासह विकेश पानघाटे, जय आबड, शंकर वऱ्हाटे, तेजराज बोढे, जगदीश चौधरी, मनोज वाकटी, रामदास कुचनकार, करुणा कांबळे, ओम ठाकूर, कुंदन पेंदार, रविंद्र कांबळे, संदीप बोथरा आणि निखील मडावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments: