कायद्याचे गाढे अभ्यासक, अनुभवी वकील, रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा तडफदार शहर नेतृत्व ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
शुभेच्छुक :- डॉ. रोहित सुधाकर वनकर (उपाध्यक्ष, वणी शहर) तथा पदाधिकारी व कार्यकर्ते
कायद्याच्या कलमांइतकाच समाजाच्या स्पंदनांचा अभ्यास असलेले, शब्दांना कृतीची जोड देणारे आणि संघटन उभारण्याची धडाडी असलेले ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांचा आज वाढदिवस.
वकिलीच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवासोबत सामाजिक कार्याची नाळ जपत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वणी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. पद हे केवळ नावापुरते न राहता त्याला कामाची किनार असावी, या भूमिकेतून त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षसंघटनेला बळ देण्याचा प्रयत्न केला.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद निवडणुकीच्या काळात त्यांनी प्रचाराचे नियोजन, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि मतदारांशी संपर्क यावर भर दिला. गल्लीबोळापर्यंत पोहोचलेल्या या संपर्क मोहिमेत स्वतःही सक्रिय सहभाग घेत त्यांनी संघटनशक्तीची चुणूक दाखविली. या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश त्यांच्या संघटनात्मक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
कायद्याचा अभ्यास, समाजकारणाची जाण आणि संघटनेला दिशा देण्याची धडपड या त्रिवेणीच्या संगमातून ॲड. निलेश चौधरी यांचा नेतृत्वप्रवास आकार घेत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा, विचारांना नवी दिशा आणि आयुष्याला यशाचे नवे क्षितिज लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
ॲड. निलेश चौधरी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!


No comments: