राजूर (कॉ.) येथे 67 वां धम्म दिक्षा दिन सोहळा, विविध धम्म उपदेशक कार्यक्रमांचे आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे 67 वा धम्म दिक्षा दिन सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात येत असून दीक्षाभूमी परिसर बुद्ध विहार येथे विविध धम्म उपदेशक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिसरी दीक्षाभूमी म्हणून राजुरची दीक्षाभूमी ओळखली जाते. राजूर कॉलरी हे चळवळीचे गाव राहिल्याने तिसरी धममा दिक्षा राजूर येथे देण्यात आली. नागपूर व चंद्रपूर नंतर राजूर कॉलरी येथे अनुयायांना दिक्षा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः राजूर कॉलरी येथे येणार होते. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे विश्वासू बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे व त्यांना बौद्ध धम्माची दिक्षा देणारे भदंत आनंद कौसल्यायन यांनी राजूर कॉलरी येथे हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्या धम्म दिक्षा सोहळ्याला 67 वर्ष पूर्ण झाले असून 28 एप्रिलला 67 वा धम्म दिक्षा दीन सोहळा याठिकाणी साजरा करण्यात येत आहे.
दीक्षाभूमी बुद्ध विहार समितीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात आयोजित या धम्म दिक्षा दीन सोहळ्यात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिलला सकाळी 10 वाजता बुद्ध विहार येथून भव्य धम्म रॅली निघणार आहे तर दुपारी 1 ते 3 या वेळात महापरित्रान पाठ होणार आहे. नागपूर येथील भंते यशवर्धन हे परित्रान पाठ घेणार असून राजूर (कॉ.) येथिल गौतमी उपासक व उपासिका संघ यात सहभाग नोंदविणार आहे. सायंकाळच्या सत्रात अजिंक्य तायडे प्रस्तुत कारवा निळ्या पाखरांचा हा बहारदार बुद्ध भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. या भव्य धम्म दिक्षा दिनाच्या सोहळ्याला वैचारिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान दीक्षाभूमी बुद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment