प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीची प्रकृती अत्यवस्थ
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा मागील एक वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या मावशीने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीला अटक केली. पवन गणेश मेश्राम (२४) रा. खडबडा मोहल्ला असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना ११ एप्रिलला उघडकीस आली. खडबडा मोहल्ला येथील तरुणाने या अल्पवयीन मुलीला प्रेमाची भुरळ घालून आपल्या जाळ्यात ओढले. मागील एक वर्षांपासून तरुणाचे या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याने प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने प्रेमाच्या भूलथापा देत वारंवार या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तरुणाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीची प्रकृती खालावली. तरुणाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितली. मुलीने घडलेला प्रसंग कथन केल्यानंतर कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. कुटुंबीयांनी सरळ पोलिस स्टेशनला धाव घेतली. मुलीच्या मावशीने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपाला केली. आरोपी पवन मेश्राम याच्यावर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी भादंविच्या कलम ३७६(२)(N), (२)(N), सहकलम ४,६ बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे करीत आहे.
Comments
Post a Comment