बालसदन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी, बहुजन स्टुडन्ट फेडरेशनचा पुढाकार
थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहर व तालुक्यात ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बहुजन स्टुडंट फेडरेशनच्या वतीनेही लालगुडा येथील बालसदन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महापुरुषांनी समाज सुधारणेसाठी केलेलं कार्य विद्यार्थ्यांना अवगत व्हावं, व महापुरुषांच्या समाज कार्याचा त्यांना अभ्यास व्हावा, या दृष्टीकोनातून बालसदन येथे जयंती सोहळा घेण्यात आला. विद्यार्थी दशेत त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना उद्याचे आदर्श नागरिक घडवावे याबाबत मान्यवरांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे व किराणा साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. त्यांच्या सोबत घालविलेला आनंदाचा क्षण त्यांना भरभरून आनंद देऊन गेला. ते नक्कीच उद्याचे यशस्वी नागरिक बनतील या प्रतिक्रिया त्यांच्यातून व्यक्त झाल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती सोहळा बालसदन येथे साजरा करून बहुजन स्टुडंट फेडरेशनने येथील बालकांचा आनंद द्विगुणित केला.
बहुजन स्टुडन्ट फेडरेशन ही वंचित व तळागाळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यात मोलाचं सहकार्य करणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन उज्वल होऊन ते यशस्वी नागरिक बनावे म्हणून ही संघटना तळागाळातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. बहुजन स्टुडन्ट फेडरेशनने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यापुढेही ही संघटना वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनून त्यांच्या जिवनात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणार आहे. माणसाला माणूस म्हणून जगता यावे, हा एकमेव उद्देश बहुजन स्टुडन्ट फेडरेशनने जोपासला आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेऊन यशस्वी जीवन जगता यावे म्हणून संपूर्ण तालुक्यात ही संघटना कार्य करीत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ऍड. राहुल खापर्डे, अनिल भोंगाडे, अनिल आसुटकर, अशोक अंकतवार, राहुल वेले, अर्चना गजभिये, प्रकाश चहानकर यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment