रात्री १२ वाजता नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली जाते साजरी, केक कापून दिल्या जातात जयंतीच्या शुभेच्छा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व बहुजनांचे उद्धारक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वि जयंती शहर व तालुक्यात ठिकठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल पासूनच शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. प्रबोधनात्मक व लोकशाहिरांचे कार्यक्रम शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी यावेळी भिम जयंती साजरी करण्यात येत असून भीम जयंतीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील मनीष नगरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १४ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १४ एप्रिलला सावर्ला येथील बुद्ध विहाराचा उदघाटन सोहळा होणार असून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक वार्डातून निघणारी मिरवणूक सम्राट अशोक नगर बुद्ध विहाराजवळ एकत्र येऊन तेथून सामूहिक मिरवणूक काढण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणारी मिरवणूक शहरवासियांचं लक्ष वेधणारी असते. प्रत्येक वार्डातून आकर्षक सजावटीसह मिरवणूक काढण्यात येते. रेल्वे स्टेशन परिसरातूनही मागील ३५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गौरकार कॉलनी, रेल्वे स्टेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. मध्य रेल्वे कर्मचारी वणी द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव दरवर्षी उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
१४ एप्रिल १८९१ ला महू या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. तो दिवस इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहिला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवन बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित राहिलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपलं संपूर्ण जीवन वेचलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला आलेली विषमता समाजातील कोणत्याही घटकाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एकाकी लढा दिला. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे सामाजिक एकोपा भारतात नांदाला. बहिष्कृत समाजाला सन्मानाचं जीवन मिळालं, ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. त्यामुळे या महामानवाची जयंती देशात उत्साहात साजरी करण्यात येते. रात्री १२ वाजतानंतर केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. फटाक्यांची आतिषबाजी करून अतिशय उत्साहात त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ रात्री १२ वाजतानंतर केक कापून बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची अतिशबाजीही करण्यात आली. समाज बांधवांनी एकमेकांना केक भरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. १४ एप्रिलला पंचशील झेंड्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात येणार असून येथून भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळून मागील ३५ वर्षांपासून अखंडितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित सर्वच कार्यक्रम रेल्वे स्टेशन परिसरात घेतले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपलं जीवन वेचलं. त्यांनी समाज उत्थानासाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेऊन रेल्वे स्टेशन परिसरात दरवर्षी त्यांची जयंती साजरी करण्यात येते.
Comments
Post a Comment