मक्तेदारीने केलेल्या शेतजमिवर हक्क गाजवत वहिवाटदार अध्यक्षालाच दिली जिवे मारण्याची धमकी
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील गणेशपूर येथे श्रीराम मंदिर देवस्थानाच्या नावाने शेतजमीन आहे. श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुष्णकुमार नंदकिशोर वर्मा (६०) रा. वणी हे या शेतजमिनीची देखभाल करतात. सध्यास्थितीत त्यांच्याकडे देवस्थानच्या शेतजमिनीचे सर्व अधिकार देण्यात आले आहे. श्रीराम मंदिर देवस्थानच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे ते वहिवाटदार अध्यक्ष आहेत. त्यांनी २०२२-२०२३ या खरीप हंगामाकरिता २.०० हे.आर. शेतजमीन सुनिल शामराव काळे (४५) रा. छोरीया ले-आऊट यांना वहिती करिता मक्त्याने दिली होती. यावर्षी तीच शेतजमीन मंदिराच्या हिताचा विचार करता त्यांनी दुसऱ्याला ज्यादा दराने दिल्याचे सुनिल काळे यांना सांगताच त्यांचा पारा चढला. त्यांनी श्रीराम मंदिर देवस्थानचे वहिवाटदार अध्यक्ष कृष्णकुमार वर्मा यांना अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत शेतजमीन वहिवाट करण्यास अडथळा निर्माण केला. मागील वर्षी खरीप हंगामात मक्त्याने दिलेल्या शेतातील बंडा पाडून सुनिल काळे यांनी देवस्थानाचे नुकसान केले होते. आता शेतजमीन वहिवाट करण्यास मज्जाव करून शेतावर जबरन ताबा मिळविण्याचा प्रयत्न आरोपीने चालविला आहे. सदर शेतजमीन ही श्रीराम मंदिर देवस्थानची असून अध्यक्ष म्हणून आपण ही शेतजमिन मक्त्याने देऊन देवस्थानाची व शेतजमिनीची देखभाल करीत आहे. परंतु सुनील काळे हे शेतजमिनीची वहिवाट करण्यास अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याने माझ्या जिवीताला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार श्रीराम मंदिर देवस्थानच्या शेतजमिनीचे वहिवाटदार अध्यक्ष कृष्णकुमार वर्मा यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सुनिल शामराव काळे यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ४४७, ४२७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment