वणी उपजिल्हा रुग्णालय हा केवळ राजकिय स्टंट, नागरिकांमधून उमटू लागल्या प्रतिक्रिया, शवविच्छेदन गृह मरणासन्न अवस्थेत


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा अद्यापही मिळाला नसल्याने हा मुद्दा केवळ राजकारणाच्या डावपेचाचा एक भाग असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. राजकारण कारण्याकरिता केवळ वणी ग्रामीण रुग्णलयाचा मुद्दा उछालण्यात येतो. उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा हा राजकारणाचाच एक भाग झाल्याचा सूर उमटू लागला आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात सोइ सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. रुग्णांना रेफर करणारं रुग्णालय म्हणून वणी ग्रामीण रुग्णालयाची ओळख निर्माण झाली आहे. रेबीज व गंभीर आजारावरील लसींचा या ठिकाणी नेहमी तुटवडा असतो. आधुनिक उपचार पद्धतीचाही या ठिकाणी अभाव दिसून येतो. ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांनी स्वतःचे दवाखाने उघडल्याने त्यांची उपचार पद्धती ग्रामीण रुग्णालय व्हाया स्व रुग्णालय अशी वळताना दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम फार जुनं असल्याने या रुग्णालयाची नेहमी डागडुजी सुरु असते. ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृह तर मरणासन्न अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे. शवविच्छेदन गृहाची अवस्था फारच दयनीय झाली आहे. शवविच्छेदन गृहाच्या भिंती व छताचे खिपले निघू लागले आहेत. स्पॅब कोसळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शवविच्छेदन करतांना डॉक्टर व कर्मचाऱ्याचा जिव नेहमी भांड्यात पडलेला असतो. शवविच्छेदन गृह म्हणजे एक प्रकारे खंडर झालं आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जिर्णोद्धाराकडे लक्ष देण्याची कुणालाही गरज वाटत नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा हा केवळ एक राजकीय स्टंट झाल्याची खुली चर्चा तालुक्यातील जनतेतून ऐकायला मिळत आहे. 

वणी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहच मरणासन्न अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे. शवविच्छेदन गृहाला अवकळा लागली असून शवविच्छेदनाची खोली अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती कधी कोसळेल ही शंका निर्माण झाली नाही. शवविच्छेदन गृह एक प्रकारे खंडर झालं आहे. भिंती व स्लॅबचे खिपले पडू लागले आहेत. स्वच्छतेचा तर या ठिकाणी पूर्णपणे अभाव दिसून येतो. अतिशय कमी जागेत हे शवविच्छेदन गृह असून अनेक वर्षांपासून या शवविच्छेदन गृहाचा जिर्णोद्धारच झालेला नाही. ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळेल व शवविच्छेदन गृहाचेही नव्याने बांधकाम होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. पण ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्याकरिता आणखी किती तप करावा लागेल, हे सांगणेच आता कठीण झाले आहे. शवविच्छेदन गृहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शवविच्छेदन करतांना डॉक्टर व कर्मचाऱ्याचा जिव नेहमी भांड्यात पडलेला असतो. मृतदेह ठेवण्याच्या ओट्याच्या बाजूला अतिशय कमी जागा असल्याने स्ट्रेचर वरून मृतदेह आणणाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.  मृतकाचे चार आठ नातेवाईक उभे राहू शकतील एवढीही जागा ओट्याचा बाजूला नाही. त्यामुळे हे शवविच्छेदन गृह आता चर्चेचा विषय बनला आहे.  

वणी ग्रामीण रुग्णालयाला मागील काही वर्षांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याचं एका राजकिय पक्षाच्या नेत्यानं उघड केलं होतं. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीला घेऊन उपोषणही करण्यात आलं. लोकप्रतिनिधींनी वणी ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे आश्वासनही दिले होते. नंतर या ठिकाणी काही थातुर मातुर सोइ सुविधाही देण्यात आल्या. लवकरच आधुनिक उपचार प्रणाली या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. पण आता रात गयी बात गयी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्यापही तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब झाला नाही. उलट ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे बोलले जात आहे. राजकारण करण्याकरिता नेत्यांकडून उपजिल्हा रुग्णालयाच्या मुद्द्याला हवा दिली जाते. हेच रेंगाळलेले प्रश्न नंतर राजकारणाचे मुद्दे बनताना दिसतात. तसाच हा वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा मुद्दा राजकीय डावपेच खेळण्याकरिता वापरला जातो. राजकीय पोळी शेकली की, मुद्दाही गायब व चर्चाही धूसर होते. जिल्हातील छोट्या तालुक्यांमध्ये सर्व सोइ सुविधा आहे. पण या ठिकाणी केवळ राजकारण भरलं आहे. त्यामुळे वणी तालुका सोइ सुविधांच्या बाबतीत अजूनही मागासला आहे. वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्याकरिता आणखी किती तप करावे लागतील, हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी