अपघातातील त्या जखमी युवकाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली, काल रात्री त्याने घेतला अखेरचा श्वास


प्रशांत चंदनखेडे वणी 

भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अखेर काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काल रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. संदिप सिडाम (३०) रा. वांजरी असे या दुर्दैवी मृत्यू ओढावलेल्या युवकाचे नाव आहे. वणी नांदेपेरा मार्गावरील स्वर्णलीला शाळेजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला अक्षरशः चिरडल्याने एक जण जागीच ठार झाला होता. तर संदीप सिडाम हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नागपूर  (जामठा) येथिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याचा काल ६ एप्रिलला रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला

२३ मार्चला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वांजरी येथिल दोन युवक दुचाकीने काही कामानिमित्त वणीकडे येत असतांना वांजरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकी ट्रकखाली अक्षरशः चिरडल्या गेली. या अपघातात धीरज आत्राम (२८) हा युवक घटनास्थळीच मृत्युमुखी पडला होता. तर संदीप सिडाम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. नागपूर (जामठा) येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु असतांना काल रात्री त्याने शेवटचा श्वास घेतला. तब्बल १४ दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. पण शेवटी त्याची झुंज अपयशी ठरली. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा असा हा दुदैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. तरुणाच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक (MH २९ BE १८१६) ताब्यात घेऊन ट्रक चालक संजय आत्राम रा. वांजरी याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. मृतक संदीप सिडाम हा ट्रक चालक संजय आत्राम याचा जवळचा नातेवाईक असल्याचे समजते. नातेवाईकाच्याच हातून नातेवाईकाचा अपघात घडल्याची ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना ठरली आहे. वांजरी येथीलच एका वीट भट्यावर मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक असलेला संजय आत्राम वीट भट्यावर सुसाट ट्रक घेऊन जात असतांना हा अपघात घडला. ट्रकखाली अक्षरशः दुचाकी चिरडल्या गेली. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालविण्याने दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. ट्रक चालकांच्या बेजाबदारपणे वाहने चालविण्याने कित्येक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. अति वेगवान वाहने चालविणाऱ्या चालकांवर व त्यांच्या मालकांवर कार्यवाही करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. ट्रकचालकांचा बेजाबदारपणा व मालकांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघाताच्या घटना प्रचंड वाढल्या असून अपघातामुळे निष्पाप जिवं मरणाच्या दारात लोटली जात आहे. वाहतूक पोलिसांनी वाढत्या अपघातांच्या घटनांवर अंकुश लावण्याकरिता भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालविणाऱ्या चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी