अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलची आर्या चौधरी सीबीएसई बोर्डाच्या एसएससी परीक्षेत जिल्ह्यात दुसरी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (सीबीएसई) काल १२ मे ला निकाल जाहीर करण्यात आले असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. शहरातील अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल या इंग्रजी माध्यमिक शाळेतील १० वि ची विद्यार्थिनी आर्या मनिष चौधरी ही ९८.२० (५०० पैकी ४९१) टक्के गुण घेऊन यवतमाळ जिल्ह्यातून दुसरी तर वणी उपविभागातून पहिली आली आहे. केवळ एका गुणामुळे तिचा प्रथम क्रमांक हुकला. तल्लख बुद्धी व अभ्यासू असलेल्या आर्याने जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केलं आहे.
आर्याने हिंदी, गणित व आय.टी या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. आय.टी. हा ऐच्छिक विषय असल्याने या विषयाचे गुण मुख्य विषयांच्या गुणांमध्ये जोडण्यात आले नाही. अन्यथा तिला ९८.५० टक्के एवढे गुण मिळाले असते. आर्याला शाळेतील शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन व कुटुंबीयांचं वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्याने तीने हे यशाचं शिखर गाठलं आहे. आर्याने आपल्या यशाचे श्रेय्य तिचे आई, वडील, काका, काकू व शाळेतील शिक्षकांना दिले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तीला पुढील शैक्षणिक वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या जात आहे.
No comments: