स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, तीन तस्करांना अटक व १६ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश करीत आलिशान कारमधून अवैध विक्री करीता अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तीन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून पोलिसांनी १६ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबी पथकाने काल १८ मे ला दारव्हा मार्गावर ही धडक कार्यवाही केली. दारव्हा मार्गे महागड्या अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. एलसीबी पथकाने या मार्गावर सापळा रचून माहितीदाराने सांगितलेल्या वर्णनाच्या कारकडे बारीक लक्ष ठेवले. त्या वर्णनाची कार येतांना दिसताच पोलिसांनी कारला थांबवून कारची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत एका पॉकिटमध्ये पांढरा पॉवडर आढळून आला. हा पॉवडर म्हणजे ड्रग्ज असल्याचे पोलिस तपासात समोर आले. महागडी नशा करणाऱ्यांची तलब भागविण्याकरिता हा ड्रग्ज पुरविला जातो. आर्थिकदृष्ट्या सक्षम व महागड्या नशेची तलब ठेवणारे अनेक जन ड्रग्जची नशा करतात. ड्रग्जचे सेवन करणारे काही ठराविक शौकीन असले तरी ड्रग्जच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. तस्करांना अमली पदार्थाच्या तस्करीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने ते विविध शक्कली लढवून ड्रग्जची तस्करी करतात. परंतु अवैध धंद्यांवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या एलसीबी पथकाने महागड्या अमली पदार्थाची ही तस्करी उधळून लावत तीन तस्करांना बेड्या ठोकल्या आहे.
दारव्हा मार्गे एका आलिशान कार मधून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दारव्हा मार्गावर सापळा रचला. काही वेळातच सांगितलेल्या वर्णनाची कार पोलिसांना या मार्गाने येतांना दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून वाहन चाकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांना यंशय येताच त्यांनी कार चालक व कारमध्ये बसलेल्या दोघांचीही कसून चौकशी केली. यात त्यांनी या कार मधून अमली पदार्थ विक्री करीता घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसांना कारच्या डिक्कीत एका पॉकिटमध्ये पांढरा पॉवडर आढळला. तो पावडर म्हणजेच ड्रग्ज असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. पोलिसांनी कार चालक व कारमधील अन्य दोघांना त्यांची नवे विचारली असता त्यांनी युनूस खान अमीर खान पोसवाल (३६) रा. लोहारा लाईन पांढरकवडा, वसीम उर्फ राजा खान अक्रम खान (३४) रा. पठाण चौक अमरावती, सय्यद इर्शाद उर्फ पिंटू सय्यद गौस (३५) रा. इकबाल कॉलनी, बेगम बाजार अमरावती अशी सांगितली. पोलिसांनी या तिघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्या जवळून १४१.६ ग्राम एमडी नामक अमली पदार्थ किंमत ११ लाख ३२ हजार ८०० रुपये, ह्युंडाई वर्णा कंपनीची कार किंमत ५ लाख रुपये व ३ मोबाईल असा एकूण १६ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पथक प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात सपोनि गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, पोउपनि योगेश रंधे, राहुल गुहे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, बंडू डांगे, अजय डोळे, रुपेश पाली, साजिद सय्यद, निलेश निमकर, सुधीर पांडे, निलेश राठोड, ऋतुराज मेडवे, अमित झेंडेकर, मिथुन जाधव, रजनीकांत मडावी, धनराज श्रीरामे, बबलू चव्हाण, चालक नरेश राऊत, जितेंद्र चौधरी, सायबर सेलच्या मपोशी प्रगती कांबळे यांनी केली.
Comments
Post a Comment