जबरी चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

गोकुलनगर परिसरातील पीर दर्ग्याजवळ जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दडून बसलेल्या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी काल मध्यरात्री मोठ्या शिताफीने अटक केली. काल १८ मे ला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार अमावस्या नाकाबंदी मोहीम शहरात राबविण्यात आली. सपोनि दत्ता पेंडकर यांच्या नेतृत्वात १० ते १५ पोलिसांचे पथक शहरात नाकाबंदी व गस्त घालत असतांना पीर दर्ग्याजवळ मध्यरात्री चार युवक संशयितरित्या आढळून आले. हे चारही जन जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दर्ग्याजवळ लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. हे चारही जन अट्टल चोरटे असून त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे नोंद आहेत. या चारही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित केलं आहे. गुन्हेगारी कारवायांवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांनी काल मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अमावस्या नाकाबंदीचे आदेश असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा काल शहरात नाकाबंदी करून गस्त घालत असतांना पीर दर्ग्याजवळ चार जन संशयितरित्या आढळून आले. हे चारही जन जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दर्ग्याजवळ लपून बसले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चारही जनांना अटक केली. संतोष उर्फ डोमा दिलीप मेश्राम (३३), शेख शाहरुख शेख सलिम (२२), शेख इरफान शेख सलिम (२४) व अनिल विनायक यमूलवार (२२) अशी पोलिसांनी अटक केलेल्या या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये विविध चोरीच्या गुन्हांची नोंद आहे. या चारही आरोपींवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३९९ व सह. १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.  

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सपोनि दत्ता पेंडकर व पोलिस पथकाने केली. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी