कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. विनायक एकरे, तर भाजपचे विजय गारघाटे यांना मिळाला उपसभापती पदाचा मान

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलने १४ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज २४ मे ला सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ऍड. विनायक एकरे यांचीच यावेळी सभापती म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तर उपसभापती म्हणून भाजपचे विजय गारघाटे यांची निवड करण्यात आली आहे. ऍड. विनायक एकरे हे कधी काळी काँग्रेसचे मातब्बर नेते मानले जायचे. पण त्यांनी काँग्रेसचा हात सोडला व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी जवळीक साधली. भाजप समर्पित पॅनलच्या माध्यमातून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढविली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सोबत त्यांनी निवडणुकीची रणनीती आखत १४ जागांवर दणदणीत विजय मिळविला. मतदारांचे मनं वळविण्याबरोबरच महाविकास आघाडीतील नाराजांनाही त्यांनी आपल्याकडे वळविले. विद्यमान आमदार व माजी सभापती यांनी या निवडणुकीत अस्सल डावपेच आखून १४ संचालकांचा विजय साकार केला. आणि याचेच फलित म्हणून ऍड. विनायक एकरे यांना सभापती पद बहाल करण्यात आले. 

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पॅनलला सहकार क्षेत्रातील निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय डावपेच आखले. दूध का जला पाणी भी फुक फुककर पिता है, असे म्हणतात. त्यामुळे या निवडणुकीत हात भाजू नये, अशी रणनीती आखण्यात आली. कधी काळी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या ऍड. विनायक एकरे यांनी भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनलच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली, आणि निवडणुकीचे चित्रच पालटले. महाविकास आघाडीतील नाराजांचीही ऍड. विनायक एकरे यांना सहानुभूती मिळाली. आणि शेतकरी एकता पॅनलच्या १४ संचालकांचा दणदणीत विजय झाला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. राजकीय डावपेच आखून बाजार समितीवर विजयाचा झेंडा फडकविला. आणि ऍड. विनायक एकरे यांना ठरलेल्या फार्मुल्याप्रमाणे सभापती पद बहाल केले. भाजपचे विजय गारघाटे हे उपसभापती पदाचे मानकरी ठरले. पाहुण्यांचे आदरातिथ्य ही संस्कृती यावेळीही जोपासण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत होती. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी