रस्ता दुरुस्तीकरणाच्या मागणीला घेऊन ब्राह्मणी ग्रामपंचायतेने केले रस्ता रोको आंदोलन, रोखून धरली वेकोलिची कोळसा वाहतूक


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरून उकनी कोळसाखानीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) रस्त्याची तर फारच दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने मार्गक्रमण करणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्यावरून दुचाकीचा प्रवास अतिशय जिकरीचा झाला आहे. या रस्त्याने दुचाकी चालवितांना तारेवरची करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातही घडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळोवेळी मागणी करूनही वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर  ब्राह्मणी ग्रामचयतेच्या माध्यमातून आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाच्या मागणीला घेऊन आज रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. 

कोळसाखानी मधून होणारी कोळशाची वाहतूक गाववासीयांनी आज रोखून धरली. कोळसा वाहतुकीचे ट्रक गावकऱ्यांनी रोखून धरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता ब्राह्मणी ग्रामपंचायतेने वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना अनेकदा निवेदने दिली. परंतु मुख्य महाप्रबंधकांनी ग्रामपंचायतेच्या निवेदनाची दखल न घेतल्याने शेवटी ग्रामपंचायतेचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी रस्ता रोको आंदोलन करून कोळसाखानी मधून होणारी कोळशाची वाहतूकच रोखून धरली. या रस्ता रोको आंदोलनात गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वेकोलिच्या कोळसाखानीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असतांना वेकोलि प्रशासन रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. वणी वरून उकनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता आमदारांनी देखील वेकोलि प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. पण वेकोलि प्रशासनाने केवळ ब्राह्मणी फाट्यापासून अर्धा किलोमीटर पर्यंत एकाच बाजूने सिमेंट रस्ता बांधून एक प्रकारे अल्टिमेटमलाच आव्हान दिले आहे. एकाच बाजूने सिमेंट रस्ता बांधण्यात आल्याने या ठिकाणी नेहमी वाहनांची कोंडी होतांना दिसते. तासंतास वाहतुकीचा जाम लागतो. पण आता वेकोलि प्रशासनाला जाब विचारणार तरी कोण. उर्वरित रस्त्याच्या बांधकामाचा मुहूर्त निघेल की नाही हीच शंका आता निर्माण झाली आहे. 

वेकोलि प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. वणी वरून उकनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असतांनाही वेकोलि प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. ब्राह्मणी फाट्यावरून अहेरी (बोरगाव) कडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता ब्राह्मणी ग्रामपंचायतेने अनेकदा वेकोलि नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना निवेदने दिली. पण वेकोलि प्रशासनाने निवेदनाची दखलच न घेतल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचतेच्या सरपंच व सदस्यांना गावकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरावे लागले. आज ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याने रस्त्याच्या दुतर्फा कोळसा वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी