वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा सुरु, फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर आकाराला जात आहे दंड
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा सुरु झाल्याने फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर दंड आकारून पथकर वसुली करण्यात येत आहे. फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर पथकर व अतिरिक्त शुल्क आकारून टोल वसूल करण्यात येत असल्याने वाहनधारकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. टोल प्लाझा सुरु होणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना न मिळाल्याने वाहनधारकांनी फास्ट टॅग घेऊन ते वाहनांवर लावले नाही. ३ मे ला अचानक टोल प्लाझा सुरु करण्यात आला. आणि फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात आला. वणी वरोरा मार्गाने शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. कोळसा वाहतूकदारांना टोल प्लाझा सुरु होण्याची पूर्व सूचनाच न मिळाल्याने त्यांनी फास्ट टॅग घेऊन ते वाहनांवर लावले नाही. त्यामुळे आता या वाहनधारकांकडून पथकाराबरोबरच दंडाची रक्कमही वसूल केली जात असल्याने वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे.
वणी वरोरा मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. या मार्गाचे काम पूर्ण होताच या मार्गावर नॅशनल टोल प्लाझा उभारण्यात आला. अनेक दिवसांपासून या टोल प्लाझाच्या टोल काऊंटरचे बांधकाम सुरु होते. टोल प्लाझाचे निर्माण कार्य प्रगती पथावर असल्याने हा टोल प्लाझा कधी सुरु होईल, याची वाहतूकदारांना कल्पनाच नव्हती. पण अचानक ३ मे ला हा टोल प्लाझा सुरु करण्यात आला. त्यामुळे मालवाहू वाहनधारकांचा चांगलाच गोंधळ उडाला. टोल प्लाझा सुरु होणार असल्याची माहिती न मिळाल्याने वाहनधारकांनी फास्ट टॅग घेऊन ते वाहनांवर लावले नाही. त्यामुळे मालवाहू व इतर वाहनांवर दंड आकारण्यात येत असल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी वाहनधारकांमधून टोल प्लाझा व्यवस्थापनाविषयी कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. पथकर व दंड अशी दुहेरी रक्कम टोल प्लाझा व्यवस्थापनाकडून वसूल करण्यात येत असल्याने वाहतूकदारांना आर्थिक भार सोसावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. टोल प्लाझा सुरु होणार असल्याची पूर्व सूचनाच न मिळाल्याने वाहधारकांना पथकारापोटी अतिरिक्त रक्कम मोजावी लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे.
वणी तालुक्यात असंख्य कोळसाखानी असल्याने येथे कोल ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. वणी वरोरा मार्गावर सतत कोळशाची वाहतूक सुरु असते. दररोज शेकडो ट्रक या मार्गाने कोळशाची वाहतूक करतात. वरोरा तालुक्यात साई वर्धा पॉवर व जीएमआर हे दोन विद्युत निर्मिती प्रकल्प असल्याने या दोन प्रकल्पांना हजारो टन कोळसा मालवाहू वाहनांच्या माध्यमातून पुरविला जातो. त्यामुळे वणी वरोरा मार्गाने शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतांना दिसतात. आधी वणी वरून वरोरा विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वरोरा व वणी या दोन्ही शहरातील टोल नाक्यांवर पथकर भरावा लागायचा. पण या टोल नाक्यांवर वाहनांना फास्ट टॅग घेऊन लावणे बंधनकारक नव्हते. वाहनधारक आपल्या वाहनांचा महिनेवारी टोल टॅक्स भरून मासिक पास घ्यायचे. पण आता वणी वरोरा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या मार्गावर राष्ट्रीय टोल प्लाझा उभारण्यात आला आहे. या टोल प्लाझावर फास्ट टॅगच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असल्याने फास्टटॅग नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे कोळसा वाहतूकदारांना पथकारापोटी अतिरिक्त रक्कम मोजावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. टोल प्लाझा सुरु होणार असल्याची पूर्व सूचना न मिळाल्याने वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून कमालीचा मनःस्ताप व्यक्त होतांना दिसत आहे. टोल प्लाझा सुरु झाल्याची माहिती नसलेल्या वाहनधारकांनाही दंडातून सूट देण्यात न आल्याने वाहनधारकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.
Comments
Post a Comment