प्रशांत चंदनखेडे वणी
आपत्ती प्रतिक्रिया बल (टीडीआरएफ) या अधिकृत व नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांच्या कंपनीला १८ वर्ष पूर्ण होत असल्याने १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफ चा वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. १ मे ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून टीडीआरएफ च्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवून टीडीआरएफच्या जवानांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. महाराष्ट्र दिनी टीडीआरएफचे संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात टीडीआरएफच्या वणी शाखेच्या वतीने रस्ते सुरक्षा, गॅस सिलेंडरचा वापर व विविध आपत्ती व्यवस्थापनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. टीडीआरएफ जवानांनी शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये पथनाट्य सादर करून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणातून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली.
९ मे ला टीडीआरएफ या नोंदणीकृत सुरक्षा जवानांच्या कंपनीला १८ वर्ष पूर्ण होणार असल्याने १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफचा वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १ मे ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. टीडीआरएफच्या जवानांनी आपत्ती व्यवस्थापनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता शहरात जनजागृती रॅली काढली. या रॅलीत रस्ते सुरक्षेचे महत्व पटवून देण्याकरिता टीडीआरएफ जवानांकडून पथनाट्य सादर करण्यात आले. हेल्मेटचा वापर व वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. तसेच गॅस सिलेंडरचा वापर करताना घ्यावयाची दक्षता पथनाट्यातून साकारण्यात आली. यावेळी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणीचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम, वणी पोलिस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे शेखर वांढरे, ज्ञानेश्वर आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते. टीडीआरएफच्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने ९ मे पर्यंत निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये प्राणी व पक्षांसाठी पाणपोई, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. टीडीआरएफ कडून वर्धापन दीना निमित्त राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता सादर केलेल्या पथनाट्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
जनजागृती रॅलीत सादर करण्यात आलेल्या पथनाट्याच्या यशस्वी नियोजनाकरिता टीडीआरएफचे क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, कंपनीचे वणी शाखा कमांडर गणेश बुरांडे, किरण चव्हाण, अस्मिता वाळके, काजल वाळके, रोहिणी लेनगुळे, बिंदिया उईके, सुमित जुमनाके, पृथ्वी पेंदोर, शिवम आवारी, रेखा उलमाले, गणेश सोनटक्के, प्राची डोंगे, संकेत काळे, वितेश वंजारी, लक्ष्मीकांत गाडगे, ईशा जुनगरी, अनुष्का नक्षीने, वैभव मडावी, आरती चव्हाण, स्नेह कौरासे, समिक्षा पाटील, त्रीशरणा दुपारे, प्रगती बढे आदींनी परिश्रम घेतले.
No comments: